Thursday 20 July 2017

[Video] फेरीवाला धारकांनी नोंदणी प्रमाणपत्र नेण्याचे पिंपरी पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील बायोमेट्रिक करण्यात आलेल्या फेरीवालेधारकांनी शुक्रवार (दि. 21) पर्यंत फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे, आवाहन पालिकेने केले आहे. 'ब' क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील फेरीवाल्यांचे डिसेंबर 2012 मध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज घेण्यात आले होते. त्यानुसार अर्ज पात्र झालेल्या फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक करण्यात आले आहे. त्या फेरीवालेधारकांना पालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालयात हॉकर्स नोंदणी फी व ओळखपत्र फी भरल्यानंतर फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. परंतु, अशा फेरीवालेधारकांनी अद्यापर्यंत 'ब' क्षेत्रीय कार्यालयातून स्वत:चे फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र नेलेले नाहीत. त्यांनी फेरीवाला नोंदणी पमाणपत्र फी, ओळखपत्र आणि आधारकार्ड दाखवून शुक्रवारपर्यंत 'ब' क्षेत्रीय कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अन्यथा त्यासंबंधीची कोणतीही जबाबदारी पालिकेची राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या पात्र व बायोमेट्री झालेल्या फेरीवाल्यांनी फेरीवाला नोंदणी फी व ओळखपत्र फी अद्यापपर्यंत भरली नाही. त्या फेरीवालाधारकांनी 'ब' क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे दाखवून शुक्रवारपर्यंत फेरीवाला नोंदणी फी व ओळखपत्र फी चलनाद्वारे भरून फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहनही केले आहे.

No comments:

Post a Comment