Friday 25 August 2017

गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या २४० बस रात्रभर धावणार

महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांची माहिती
शुक्रवारपासून (दि. २५) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रात्रभर बससेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये विविध उपनगरांना जोडणारा वर्तुळमार्ग सुरू केला जाणार आहे. संपूर्ण शहरात विविध मार्गांवर एकूण २४० बस धावणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे प्रथमच पीएमपीएमएलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment