Friday 23 February 2018

पालिका उभारणार साडेनऊ हजार घरे

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महापालिकेतर्फे शहरात एकूण १० गृहप्रकल्पात ९ हजार ४५८ परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ९३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आत्तापर्यंत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, रावेत आणि आकुर्डी येथील गृहप्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. तसेच, संबंधित प्रकल्पांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीची मंजुरी मिळाली आहे. 

No comments:

Post a Comment