Monday 12 February 2018

वाकडमधील अडीच किलोमीटर लांबीचे उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून उभारण्याचे नियोजन – नगरसेवक संदिप कस्पटे

हिंजवडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करण्याबरोबरच महत्त्वाचे मार्गही सक्षम करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यानुसार वाकड येथील कस्पटेवस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. परंतु, एवढा मोठा उड्डाणपूल उभारण्याचा खर्च महापालिकेला पेलवणारा नाही. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकारने करावा यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामार्फत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी दिली.

No comments:

Post a Comment