Tuesday 3 April 2018

अनाथ मुलांना सरकारी नोकरी व शिक्षणात 1 टक्का आरक्षण

राज्यशासनाचा निर्णय जाहीर
मुंबई – राज्यातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या अनाथांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जगण्यासाठी जातीपासूनच्या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुला-मुलींना शासकिय नोकऱ्यांपासून ते शासकिय लाभापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी पात्र होता येत नव्हते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथांना 1 टक्के समांतर आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अनाथ मुलांना आऱक्षण देण्यासंबधीचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला.

No comments:

Post a Comment