Wednesday 23 May 2018

“मेट्रो’मार्गावर पावणे दोनशे वृक्षांना पुनरुज्जीवन!

पिंपरी – सजीवांमध्ये केवळ वृक्ष-वनस्पतीच अशी प्रजाती आहे, की जिचे बीज एकदा जिथे रोवले गेले तिथेच शेवटपर्यंत वाढत राहते. परिस्थिती कशी जरी असली तरी पलायन किंवा स्थलांतर करण्याची मुभा निसर्गाने वृक्ष-वनस्पतींना दिली नाही. कित्येक विकास प्रकल्पांमध्ये आडव्या येणाऱ्या झाडांना विकासासाठी आपला बळी द्यावा लागतो. परंतु, “मेट्रो’ प्रशासनाने वृक्षांची कत्तल न करता त्यांनाही स्थानांतरणाचा अनुभव मिळवून दिला आहे. अतिशय आधुनिक पद्धतीने 171 झाडांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment