Wednesday, 9 May 2018

‘या पापांचा मी धनी नको’… भाजपपासून अलिप्त राहण्याचा नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचा निर्णय

पिंपरी (Pclive7.com):- देशात आज नागरिक सुरक्षित नाही. बहुजन समाजावर अन्याय वाढलायं. दलित समाजाला सरकारी नोकरीतील पदौन्नती रोखली. भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. अँट्रोसिटी कायद्यात बदल झाल्याने कायदा पांगळा झालायं. शहरात भाजपाची सत्ता येऊन वर्ष झाले, मात्र कचरा, पाणी यासारखे अनेक प्रश्न तडीस गेले नाहीत. नगरसेवक होऊन मी समाधानी नाही. या पापांचा मला धनी व्हायचे नाही असे सांगत भाजपपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment