Friday 22 June 2018

बस चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्या पीएमपीच्या 96 चालकांवर कारवाई

पुणे :- गाडी चालवतांना मोबाईलवर बोलण्याने अपघाताची दाट शक्यता असते आणि अनेकांचे अपघातात बळी देखील गेले आहेत. यामुळे पीएमपी प्रशासनाने पीएमपीच्या बस चालविणाऱ्या 96 चालकांवर मोबाईलवर बोलत असल्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमिवर फोनवर बोलत पीएमपी बस चालविणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तसेच मोबाइलवर बोलत बस चालवितानाचा पी एम पी चालकाचा फोटो पाठवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment