Saturday 2 June 2018

रंगीबेरंगी पक्ष्यांसोबत....

पक्षी आणि प्राणी यांचे ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ हे अनोखे प्रदर्शन आजपासून कापसे लॉन, कोकणे चौक, रहाटणी,पिंपरी चिंचवड, पुणे येथे सुरु झाले आहे. यावेळी रंगबेरंगी पक्षी आणि प्राण्यांचे निरीक्षण करताना छोटी मुले दिसत आहेत. या प्रदर्शनामध्ये परदेशी पक्षी, मासे, कुत्री आणि मांजरी यांच्या सुमारे २०० हुनही अधिक जाती, यामध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर देशांतील पक्ष्यांच्या १२० जाती, तसेच अरकारी टोकन, स्टेलास, आफ्रिकन पोपट, कनूर जातीचे रंगीबेरंगी पक्षी, हाताच्या बोटावर बसणारे लव्ह बर्डस, फिंचेस, परदेशी रंगीत कोंबड्या, परदेशी बकऱ्या, गिनिपिग तसेच पूर्ण खऱ्या झाडांनी सजवलेली सुमारे ३० मत्स्यालये आणि माश्यांच्या १००हुन जास्त जाती तसेच त्यामध्ये समुद्री खाऱ्यापाण्यातील सुमारे ३० जातींचे मासे एकाच ठिकाणी पक्षी आणि प्राणीप्रेमींना बघायला मिळणार आहेत. त्यांचे मूळ गाव ते त्यांच्या खाण्यापासून इतर सवयींबद्दलची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (३ जुन) सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहील.

No comments:

Post a Comment