Wednesday 25 July 2018

गृहप्रकल्प निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी

‘दिशा’च्या बैठकीत सुलभा उबाळे यांची मागणी
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी घराची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील गृहप्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आक्षेप घेत दिशा समितीच्या सदस्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली. तसा ठरावदेखील शनिवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत मंजूर करण्यात आला. आता हा ठराव भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. दिशा समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्या सुलभा उबाळे यांनी पिंपरी महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत रिंग, वाढीव दराने निविदा मंजुरी देण्यात येत असल्याकडे लक्ष्य वेधले. त्या म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सेक्टर नंबर 12 मध्ये उभारत असलेल्या घरांसाठी आलेल्या निविदांच्या तुलनेत महापालिकेच्या प्रकल्पासाठी वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात येत आहेत. त्यावर दिशा समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करावी. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाकडे रितसर पत्र पाठविण्याचे आदेश दिले आहेत,

No comments:

Post a Comment