Saturday 21 July 2018

वृक्ष प्राधिकरण समिती रद्दच करण्याची मागणी

पिंपरी : महापालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. यंदा 60 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. परंतु, उद्यान विभागाने अद्यापर्यंत केवळ 20 हजार वृक्षांचीच लागवड केली आहे. मात्र, त्या बाबतच्या सविस्तर माहितीचा आग्रह सदस्यांनी धरल्यानंतर अधिकार्यांची धांदल उडाली. त्यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे सदस्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. त्याबाबतचा अहवाल सोमवारपर्यंत (दि. 23) देण्याच्या सक्त सूचना समितीने दिल्या आहेत. अहवाल मिळाल्यानंतर सदस्य प्रत्यक्ष झाडांची पाहणी करणार आहेत. अधिकारी नगरसेवकांना माहिती देणार नसतील तर वृक्ष प्राधिकरण समितीच रद्द करा. प्रशासनाला जसे वाटतील तसे निर्णय तुम्ही घ्या, असेही नगरसेवकांनी अधिकार्‍यांना सुनावले.

No comments:

Post a Comment