Wednesday 4 July 2018

बांधकाम क्षेत्राला जीएसटीकडून अपेक्षा

पिंपरी/वाकड – गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या चक्रात अडकलेल्या बांधकाम क्षेत्राला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. घरांच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याच्या बाहेर गेल्यामुळे बांधकाम व्यावसायिक हतबल झाले आहेत. एक वर्षांपूर्वी सरकारने कर प्रणालीत ऐतिहासिक बदल घडवून आणले आणि जीएसटी लागू केला. जीएसटीमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये सर्वात अधिक वापरल्या जाणाऱ्या सिमेंटवर 28 टक्‍के जीएसटी लावण्यात आला. जीएसटीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर करांच्या दरात काही बदल होण्याची अपेक्षा आहे. सिमेंटचा जीएसटी दर 28 वरून 18 टक्‍क्‍यांवर आणण्याचा सरकार विचार करीत असल्याचीही चर्चा आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment