Sunday 22 July 2018

शहरातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्थेत

 इसिएने दिले आयुक्तांना निवेदन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. शहरात नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सार्वजनिक शौचालय सारख्या मुलभूत सुविधा स्वच्छ भारत अंतर्गत पुरविल्या आहेत. पण त्या सोयी-सुविधांची दैनंदिन काळजी व जोपासना करण्याची जबाबदारी पार पाडण्यात पालिका अयशस्वी झाली आहे. आपण त्वरित शहरातील सर्व शौचालये आणि सार्वजनिक जागांची दैनंदिन स्वच्छता व निगा राखण्याबाबत धोरण अमलात आणून नागरी आरोग्याच्या बाबत कठोर पावले उचलावीत. आपल्या शहरातील स्वच्छ भारत अंतर्गत उभारलेली स्वच्छतागृह बेवारस झाली आहेत. त्यांच्या साफ-सफाईची कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा मागणीचे निवेदन इसिएतर्फे महापालिका आयुक्तांना दिल्याचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment