Monday 20 August 2018

शांतता आणि सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांचे केले कौतुक

रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडतर्फे अभिनव उपक्रम
पिंपरी : देशाच्या सीमेवर रात्रंदिवस जागता पहारा देऊन सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर पोलीस प्रशासन देशांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था चोख राखत आहे. त्यामुळे सैनिकांचे कौतुक करत असताना देशांतर्गत सुव्यवस्था राखणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, आपले कर्तव्य आहे. हाच धागा पकडत रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडने ‘शुक्रिया ए वतन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारी कर्मचार्‍यांचा सन्मान केला. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील ए.सी.एस. कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, प्रणव लेले, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डॉ. डी. वाय. पाटील ए.सी.एस.चे अध्यक्ष पुनीत माने, दिग्विजय हांडे, सिद्धांत अगरवाल, उमर इनामदार, तेजस समर्थ, तुषार समर्थ, गोपाल सावंत, विकास काकारपार्थी, ओमंग कुमार थामन, नीरज कुमार, स्वप्नील कोल्हे, प्रितेश पोरेड्डी, सई सोहनी, यशराज खंडागळे, निश्‍चय वर्मा, गुंजन चौधरी, विप्लव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment