Monday 20 August 2018

महापालिका करणार दीड कोटींच्या भंगाराचा लिलाव

मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला प्रस्ताव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडे विविध विभागाकडील जुने, निरुपयोगी असे दीड कोटी रुपयांचे भंगार आहे. भंगार निरुपयोगी झाले असून फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिका या भंगाराचा लिलाव करणार आहे. महापालिकेच्या नेहरुनगर व इतर ठिकाणच्या गोडाऊन येथे विनावापराचे व फेरवापर होणार नाही असे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रूपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे. या भंगाराचा लिलाव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे. यासाठी हा ठराव विधी समिती समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment