Tuesday 4 September 2018

पिंपरी चिंचवड शहर विकासाबाबत सूचना आणि कल्पना सुचविण्याचे आयुक्तांचे आवाहन

चौफेर न्यूज –  लोक सहभागातून सर्व समावेशक व शाश्वत प्रगती करून २०३० पर्यंत पिंपरी चिंचवड शहराला भारतातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्याचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून त्याकरिता नागरिकांनी शहर विकासाबाबतच्या आपल्या सूचना व कल्पना ७ दिवसांमध्ये  महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये लेखी स्वरुपात अथवा cto@pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. शहरातील विविध समाजिक संस्थांचे पदाधिकारी व विविध प्रसारमाध्यमांचे संपादक यांच्या समवेत पिंपरी चिंचवड शहर विकासाचे धोरण व शहर परिवर्तन आराखड्याबाबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment