Friday 28 September 2018

महापालिकेच्या वायसीएम व जलशुद्धीकरण केंद्रात सौर उर्जा प्रकल्प उभाणीस मंजुरी

सौर उर्जेतून वीज निर्मिती प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तेचा ताबा तब्बल 25 वर्षे ठेकेदार एजन्सीला मोफत का द्यायचा. पालिकेची आर्थिक क्षमता असताना ठेेकेदाराला पोसण्यासाठी हा प्रकल्प का राबवायचा, असा सवाल सत्ताधार्‍यांसह विरोधी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित करीत, आयुक्तांसह अधिकार्‍यांना धारेवर धरले. अखेर विरोध डावलून सत्ताधार्‍यांनी क्‍लीन मॅक्स कंपनीसोबत रेस्को तत्वावर सदर 459 किलो वॅटचा प्रकल्प यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) व सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यास मंजुरी दिली.

No comments:

Post a Comment