Sunday 2 September 2018

वाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका

हिंजवडीतील उद्योगांचे वार्षिक 1500 कोटींचे नुकसान
कंपनीत पोहोचण्यासाठी कर्मचार्‍यांना वार्षिक बारा लाख किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास
पिंपरी-चिंचवड : राज्यातील सर्वात मोठे ‘आयटी पार्क’ अशी ओळख असलेल्या हिंजवडी ‘आयटी पार्क’कडे जाणार्‍या रस्त्यावर होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे तेथील लहान-मोठया कंपन्यांचे मिळून वार्षिक तब्बल पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये पोहोचण्यासाठी कर्मचार्‍यांना वार्षिक बारा लाख किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. विविध अडचणींमुळे कंपन्यांचे होत असलेले स्थलांतर, कार्यप्रणाली आणि विविध सेवा-सुविधांवर येत असलेला ताण आणि कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवर झालेला प्रतिकूल परिणाम यामुळे कंपन्यांची उत्पादन क्षमता घटत असून कंपन्यांना वार्षिक तोटाही सहन करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment