Saturday 29 September 2018

शहरातील नऊ जणांना व दोन शाळांना कृतीशील जिल्हास्तरीय पुरस्कार

निगडी – महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय कृतीशील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील नऊ जणांना व दोन शाळांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. कृतीशील मुख्याध्यापक म्हणून चिंचवड येथील फत्तेचंद जैन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हिंदूराव नानासाहेब कलंत्रे, वाल्हेकरवाडी येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जयसिंग शितोळ यांची निवड करण्यात आली आहे. कृतीशील शिक्षक पुरस्कार धनराज संभाजी गुटाळ, गणेश अण्णा झोडगे, वंदना अलोक मिश्रा, माया माणिक पाटोळे, सौदागर कृष्णा केमदाराने यांना दिला जाणार आहे. तसेच कृतीशील शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार बिपीनचंद्र दादासाहेब माने, संदिप कारभारी गर्कळ यांना जाहीर करण्यात आला आहे. शहरातील कृतीशील शाऴा म्हणून ज्ञानदीप माध्यमिक व सौ अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालय रुपीनगर-तळवडे व शिवभूमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यमुनानगर निगडी यांनी जाहिर झाला आहे.

No comments:

Post a Comment