Friday 21 September 2018

शहरातील मोकाट कुत्री, डुक्करे व जनावरांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचा आयुक्त हर्डीकरांचा दावा

पिंपरी-चिंचवड शहरात या वर्षी आतापर्यंत तब्बल 11 हजार कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.  त्यासाठी 3 एजन्सी काम करीत आहेत. तर, डुक्करे पकडण्यासाठी नवीन एजन्सीचे प्रत्यक्ष काम 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, असे सांगून शहरातील मोकाट कुत्री, डुक्करे व जनावरांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचा दावा पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला.

No comments:

Post a Comment