Saturday 22 September 2018

पुणे-नाशिक महामार्गाजवळील सेवा रस्त्यांच्या नाल्यांची होत नाही नियमित स्वच्छता

चाकणमधील सेवा रस्ते पाण्यात
आयआरबीच्या नालेसफाईचे पितळ उघडे
चाकण : चाकण परिसरात पुणे-नाशिक महामार्गाजवळील  सेवा रस्त्यांच्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत  नसल्याने त्यांचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे  पाणी वाहून जाण्यास कशी अडचण निर्माण होते  याचा अनुभव रविवारी (दि.16) दुपारी झालेल्या  मुसळधार पावसाने आला. सेवा रस्त्यांच्या  जवळच्या गटारींची योग्य स्वच्छता न झाल्याने  घाण, कचरा नाल्यात साचत गेला असून हे नाले  बंद झाले आहेत. मागील महिन्यात आयआरबी कं पनीकडून या गटारी मोकळ्या करण्याचा  थातुरमातुर प्रयत्न करण्यात आला. मात्र त्या  स्वच्छतेचे पितळ रविवारी झालेल्या मुसाधार  पावसाने उघडे पाडले आहे. तळेगाव चौक आणि  आणि आंबेठाण चौक येथे सेवा रस्त्यांची अवस्था  अत्यंत दयनीय झाली असून पाणी वाहून जाण्यास  वाट नसल्याने या भागात पावसाच्या पाण्याचा  निचराच होत नसल्याची स्थिती पुन्हा एकदा  समोर आली आहे. मागील महिन्यात या  महामार्गावर टोल वसुली करणार्‍या आयआरबी कं पनीने सेवा रस्त्यांच्या लगतच्या गटारी मोकळ्या  करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये अनेक  ठिकाणी संबंधित गटारे बंद झाल्याची विपर्यस्त  स्थिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment