Monday 1 October 2018

महापालिकेतील चुकीच्या कामाबाबत आवाज उठविण्यात विरोधक ठरले अपयशी

निष्क्रिय विरोधक, भरकटलेले सत्ताधारी अन् गोंधळलेले प्रशासन!
विरोधकांनी अद्याप एकही आरोप केला नाही सिद्ध
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेतील चुकीच्या कामाबाबत आवाज उठविण्यात विरोधक सपशेल अपयशी ठरले आहेत. दीड वर्ष होऊनही सत्ताधार्‍यांना पारदर्शक कारभाराची चुणूक दाखविता आली नसून ते भरकटलेले आहेत. तर, दुसरीकडे अधिकार्‍यांची कमतरता असल्यामुळे प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत असून ढिम्म झाले आहे. कामचलावू कामकाज केले जात आहे. परिणामी, शहराचा विकास संथगतीने सुरू आहे. यामुळे शहरातील जनता सत्ताधारी आणि विरोधकांच्या कामगिरीवर नाखूष आहे. पारदर्शक कारभारासाठी शहरवासियांनी पिंपरी महापालिकेत मोठ्या अपेक्षेने सत्तांतर करत भाजपकडे एकहाती सोपविली. त्यामुळे अनेक वर्ष विरोधात असलेले सत्ताधारी झाले अन् पक्षाच्या स्थापनेपासून सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसवाले विरोधात बसले. तथापि, दीड वर्ष होऊनही सत्ताधार्‍यांना कामाची चुणूक दाखविता आली नाही. अडखळतपणे कामकाज सुरु असून अद्यापही प्रशासनावर वचक निर्माण करता आला नाही. तर, विरोधकांनी केवळ आरोपांच्या फैरी झाडल्या असून एकही आरोप अद्याप सिद्ध करू शकले नाहीत.

No comments:

Post a Comment