Tuesday 30 October 2018

सतरा हजार बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस

पिंपरी - महापालिकेतर्फे शहरातील महापालिका रुग्णालये व दवाखान्यांमध्ये देण्यात येणाऱ्या पोलिओ प्रतिबंधक लस या वर्षभरात १७ हजार १५ बालकांना देण्यात आली. सप्टेंबरअखेरपर्यंतची ही स्थिती आहे.
पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. बालकांना दिव्यांग करणारा हा संसर्गजन्य रोग आहे. देशात १९९५ पासून पोलिओ प्रतिबंधक मोहिमेला सुरवात झाली. जागतिक आरोग्य संघटनेने २०१४ मध्ये भारताला १०० टक्के पोलिओमुक्त जाहीर केले. महापालिका रुग्णालयांमध्ये बालकांना जन्मत:च पोलिओचा डोस दिला जातो. त्यानंतर दीड, अडीच आणि साडेतीन महिन्यांचे बाळ झाल्यानंतर ओरल पोलिओ डोस दिला जातो. त्याशिवाय दीड आणि साडेतीन महिन्यांच्या बाळाला इंजेक्‍शनद्वारे पोलिओ डोस दिला जातो. ९ महिने आणि १.५ वर्षाचे बाळ झाल्यानंतर ओरल पोलिओ डोस दिला जातो.

No comments:

Post a Comment