Saturday 27 October 2018

मेट्रो डीपीआरचे पालिकेत सादरीकरण

पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या वाढीव मेट्रो मार्गिकेच्या विस्तृत प्रकल्प आराखडा अहवालाचे (डीपीआर) सादरीकरण महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर गुरुवारी (दि. 25) केले. या 4.9 किलोमीटर अंतराच्या वाढीव मार्गासाठी 1,100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्यातच पूर्ण करण्यास महामेट्रो प्राधान्य देणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सदर डीपीआर मंजुरीसाठी पालिका राज्य शासन व केंद्राकडे पाठविणार आहे.

No comments:

Post a Comment