Sunday 9 December 2018

विकास प्रकल्पावरील देखरेखीसाठी ‘केपीएमजी’ सल्लागार म्हणून नियुक्त

एका वर्षांसाठी पालिका अदा करणार 90 लाख ; स्थायी समितीची मंजुरी
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या जेएनएनयुआरएम, अमृत, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेल्या प्रकल्पावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी आता केपीएमजी अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. या कामाच्या एका वर्षांकरीता पालिका तब्ब्ल 90 लाख 3 हजार रूपये खर्च करणार आहे. सदर कामासाठी पालिकेने सिटी ट्रान्सफार्मेशन ऑफीससाठी (सीटीओ) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खासगी कंपनीची अगोदरच नियुक्ती केली आहे. असे असतानाही त्याच कामांसाठी नव्याने खासगी  सल्लागार नेमून उधळपट्टीस चालना दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

No comments:

Post a Comment