Saturday 1 December 2018

शहरात धावणार दहा इलेक्ट्रिक बस

महापौरांनी दहा किलोमीटर चालवून घेतली चाचणी
पिंपरी-चिंचवड : पर्यावरणपूरक आणि वातानुकूलीत असलेल्या एकूण 25 एसी ‘इलेक्ट्रिक’ बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. त्यासाठी या बसची शहराच्या विविध मार्गावर चाचणी सुरू आहे. गुरुवारी चिखलीत महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बसची चाचणी घेण्यात आली. या दहा बस भाडेतत्वावर शहराच्या विविध मार्गांवर सोडल्या जाणार आहेत. दरम्यान, महापौरांनी ही बस दहा किलोमीटर चालवून चाचणी घेतली.

No comments:

Post a Comment