Tuesday 19 March 2019

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात लिमिटलेस व पदुर या लघुपटांना प्रथम पुरस्कार

चिंचवड (दि. १८ मार्च) :-   पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने १६ व १७ मार्चला प्रथमच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे (शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जगातील वेगवेगळ्या ५० देशांतून आलेल्या २४६ लघुचित्रपटांपैकी परीक्षकांनी निवडलेले ४१ लघुचित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळाली. त्याचे पारितोषिक वितरण रविवारी (१७ मार्च) झाले. यात प्रथम क्रमांक लिमिटलेस या राधेय तावरे दिग्दर्शित व पदुर या नवनाथ कांबळे दिग्दर्शित लघुपटाला विभागून देण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक देखील प्रदीप पवार दिग्दर्शित अंतेष्टी व जस्टीन ऑल्स्टीन दिग्दर्शित द व्हिजीटरला विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक असीफ मोयाल दिग्दर्शित जरीवाला आसमान या लघुपटाला देण्यात आला.

No comments:

Post a Comment