Friday 8 March 2019

‘८ मार्च’ला का साजरा केला जातो ‘जागतिक महिला दिन’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात होऊन तब्बल १०९ वर्ष होत आहेत. या निमित्ताने जागतिक सोशल मीडियातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पण अनेकांना हे माहितीच नसते की, ८ मार्चला जागतिक महिला दिन का साजरा केला जातो किंवा जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरूवात कधीपासून व कशी झाली. अमेरिकेत समाजवादी महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि मतदानाच्या हक्कासाठी याच दिवशी १९०८ मध्ये मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.

No comments:

Post a Comment