Friday 8 May 2020

दरमहा पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो रुपये

पिंपरी – शहरातील सोसायट्या सध्या पाणीटंचाईने हैराण झाल्या आहेत. लॉकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नसताना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठीही सोसायटीधारकांना टॅंकर मागविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यासाठी दरमहा लाखो रुपये सोसायटीतील रहिवासी मोजत आहे. महापालिका आमची पाणी समस्या कधी सोडवणार, असा सवाल सोसायटीतील नागरिक विचारत आहेत. 

No comments:

Post a Comment