Tuesday 12 May 2020

स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामांना गती

महापालिका प्रशासन : कामगारांना मिळाला दिलासा

पिंपळे गुरव – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे सर्व उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय तसेच विकासकामे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. परंतु शासनाने लॉकडाऊनमधील काही अटी शिथिल करून नियमांचे पालन करत उद्योगधंदे, व्यापार व विकासकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना करोनामुळे खिळ बसली होती ती निघाल्याने पुन्हा एकदा विकासकामांनी गती घेतली आहे. त्यामुळे कामगारांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.b

No comments:

Post a Comment