Wednesday, 13 June 2012

महा-ई सेवा केंद्रांमध्येही मिळणार रेशनकार्ड

महा-ई सेवा केंद्रांमध्येही मिळणार रेशनकार्ड: पुणे। दि. २२ (प्रतिनिधी)

परिमंडळ कार्यालयांमध्ये होणारी गर्दी व वाढती एजंटगिरी टाळण्यासाठी येत्या १ जुनपासून शहरातील सर्व ४८ महा-ई सेवा केंद्रांमध्येच रेशनकार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात १७८ ठिकाणी महा-ईसेवा केंद्र सुरु आहेत. या महा-ई सुविधा केंद्रावर सध्या महसूल विभागा मार्फत देण्यात येणारे विविध दाखल्यांचे वाटप केले जाते. या महा-ई सुविधा केंद्रामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून, रांगामध्ये ताटकळत उभे न राहता त्वरीत काम होते. पुरवठा विभागामार्फत सध्या सर्व परिमंडळ कार्यालयामध्ये रेशनकार्डांचे वाटप करण्यात येते. परंतु अर्ज केल्यानंतर दोन-तीन महिने प्रतिक्षा करुनही नागरिकांना रेशनकार्ड मिळत नाही. यामुळे प्रत्येक परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटाचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी येत्या १ जूनपासून शहरातील ४८ महा-ईसेवा केंद्रांमध्येच रेशनकार्ड देण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन रेशनकार्ड, नाव, पत्ता यामध्ये बदल सर्व प्रकारचे अर्ज महा-ईसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दोन दिवसांत आधारचे काम सुरू होणार

गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली आधार कार्ड देण्याची मोहिम पुन्हा सुरु होत असून, येत्या दोन दिवसात ग्रामीण भागात प्रत्येक्ष मोहिम सुरु होणार आहे. यासाठी शासनाने नवीन ३ सॉफ्टवेअर कंपन्यांची नेमणूक केली आहे. या कंपन्या मार्फत आधार कार्डांचे वाटप करण्यासाठी सुमारे २00 युनिट लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात आता पर्यंत ३६ टक्के नागरिकांना आधार कार्डांचे वाटप करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment