Tuesday 21 August 2012

डॉक्टरांकडून ५५ लाखांचा गंडा

डॉक्टरांकडून ५५ लाखांचा गंडा: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)

दवाखान्यामध्ये ६५ जण अँडमिट झाले असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून तिघा डॉक्टरांनी एका विमा कंपनीला ५५ लाख ४0 हजार रुपयांचा गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे. शिवाजीनगर येथे मे २0१0 ते जुलै २0११ या कालावधीमध्ये ही घटना घडली.

डॉ. धनंजय जाव्हीर (रा. विद्यानगर, विo्रांतवाडी), डॉ. मंदार कापरे (रोझरी शाळेजवळ, वारजे), डॉ. वैभव शहा (रा. पारस हॉस्पिटल, बिजलीनगर, चिंचवड) यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मेडी असिस्ट टीपीए कंपनीचे अधिकारी तातीनेनी वेंकटा शिवाप्रसाद (वय ५७, रा. कांजूर मार्ग, वेस्ट मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. द न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अधिकृत डॉक्टर म्हणून डॉ. जाव्हीर, डॉ. कापरे व डॉ. शहा यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी मेडीक्लेम उतरविलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना यश हॉस्पिटल, सोनोने सर्जिकल, सुपरटेक हॉस्पिटल येथे अँडमिट करण्यात आल्याची खोटी कागदपत्रे तयार केली. तसेच मोठी रक्कम विमा कंपनीकडून घेतली.

No comments:

Post a Comment