Tuesday 21 August 2012

आचार्य अत्रे रंगमंदिराच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32530&To=6
आचार्य अत्रे रंगमंदिराच्या देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष !
पिंपरी, 19 ऑगस्ट
मोडक्या खुर्च्या, बंद पडलेली वातानुकुलन यंत्रणा, मेकअप रुममधील तुटलेले बल्ब, रंगमंचावरील बिघडलेले स्पॉटलाईट, विद्युत यांत्रिकी व्यवस्था बंद पडलेला मुख्य पडदा, तुंबलेले स्वच्छतागृह आणि प्रेक्षागृहात सर्वत्र पसरलेला कुबट वास. हे वर्णन आहे एकेकाळी गाजलेल्या नाट्यप्रयोगाचे साक्षीदार असलेल्या पिंपरीच्या आचार्य अत्रे रंगमंदिराचे. या दुरवस्थेपायी येथे येणा-या रंगकर्मींना अनेक अडचणींना तोंड देत आपली कला सादर करावी लागत आहे. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास या रंगमंदिराची 'गेल्या दहा हजार वर्षात' डागडुजी झाली नाही असेच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment