Friday 21 September 2012

अखेर पिंपरी महापालिकेचा मेट्रोला 'ग्रीन सिग्नल' ; सुमारे बाराशे कोटींचा खर्च

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33405&To=10
अखेर पिंपरी महापालिकेचा मेट्रोला 'ग्रीन सिग्नल' ; सुमारे बाराशे कोटींचा खर्च
पुणे महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेट्रो प्रकल्पाचे घोडे गंगेत न्हाले. पिंपरी महापालिका हद्दीतील 7.153 किलोमीटर लांबीच्या मार्गाला आज (गुरुवारी) महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी सुमारे बाराशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पिंपरी ते निगडी, औंध ते रावेत आणि नाशिकफाटा ते मोशी हे तीन मार्गही सर्वपक्षिय सदस्यांनी सूचविले. मात्र दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मान्यतेनंतरच त्याला अंतिम स्वरुप येणार असून नाशिकफाटा उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरमुळे मूळ आराखड्यात बदल होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment