Friday 21 September 2012

"अपघातमुक्त शहर' संकल्पाचे जोरदार स्वागत

"अपघातमुक्त शहर' संकल्पाचे जोरदार स्वागत: पिंपरी -&nbsp पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर अपघातमुक्‍त करण्याचा संकल्प "सकाळ' माध्यम समूहाने जाहीर केला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा विचार करता ही व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी किमान दोन हजार नवीन बसेस पीएमपीएलच्या ताफ्यात येणे गरजेचे आहे. मात्र, सध्या या संस्थेची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी "सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. लाखो नागरिकांना भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सर्वक्षेत्रातील नागरिक बंधू आणि भगिनींचा समावेश असणार आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आज जवळपास 60 लाख आहे. वाहनांची संख्या 30 लाखांच्या दरम्यान आहे. केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कमकुवत असल्याने, सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हीच समस्या मुंबईकरांना भेडसावत नाही. कारण, तिथे "बेस्ट'सारखी अत्यंत कार्यक्षम सेवा उपलब्ध आहे. कोणत्याही बसथांब्यावर मिनिटात प्रवाशांना बस मिळते. त्यामुळे "बेस्ट'ची वाहतूक आदर्श म्हणून ओळखली जाते. तशीच सार्वजनिक वाहतूक सेवा आपण पुणे, पिंपरीत करून "हम भी किसीसे कम नहीं' हे दाखवून देण्याचा सर्वांच्या सहकार्याने आमचा प्रयत्न आहे. 

No comments:

Post a Comment