Friday 26 October 2012

'एम्पायर इस्टेट' उड्डाणपुलासाठी वाद निवारण मंडळ !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34165&To=10
'एम्पायर इस्टेट' उड्डाणपुलासाठी वाद निवारण मंडळ !
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या बीआरटीएस मार्गावर पवना नदी ते मुंबई-पुणे लोहमार्ग व महामार्ग यांना ओलांडणारा एम्पायर इस्टेट येथून ऑटो क्लस्टरपर्यंतचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामात काही कायदेशीर वाद निर्माण झाल्यास हे वाद मिटविण्यासाठी तीन सदस्यीय वाद निवारण मंडळाची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका आणि ठेकेदारांच्या दोन स्वतंत्र प्रतिनिधींसह संयुक्त एका प्रतिनिधीचा त्यात समावेश असणार आहे. संयुक्त प्रतिनिधी म्हणून सिडकोचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता पी. एस. आंबिके यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यास आज (गुरुवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment