Friday 26 October 2012

गॅस एजन्सी मनमानीला जिल्हाधिकार्‍यांची चपराक

गॅस एजन्सी मनमानीला जिल्हाधिकार्‍यांची चपराक: पुणे। दि. २३ ( प्रतिनिधी)

नवीन गॅस कनेक्शन घेताना मनमानी दर लावणे, त्याचसोबत गृहोपयोगी वस्तू घेणे बंधनकारक करणे, गॅस सिलिंडरसाठी अधिकचे पैसे घेणे, अशा गॅस एजन्सीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर गॅस सिलिंडरचे दर, नवीन गॅस कनेक्शनसाठी लागणारे पैसे याबाबतचे सविस्तर दरपत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांना वर्षाला सहाच सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर नवीन गॅस कनेक्शन देताना एजन्सी दुप्पट पैसे उकळत आहेत, तर काही एजन्सी तेलाचा डबा, तांदूळ, भांडी, अशा वस्तू घेण्याचा आग्रह करतात. घरपोच सिलिंडर देत नाहीत, तक्रारीसाठी फोन केल्यास फोन उचलत नाहीत, अशा अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांत या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीला दर्शनी भागावर प्रत्येक गोष्टीचे दरपत्रक लावण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच अशा प्रकारे ग्राहकांची पिळवणूक केल्यास कारवाई करण्याची तंबी दिली आहे.

No comments:

Post a Comment