Wednesday 24 October 2012

‘सोनं’ तोडल्यास गुन्हा!

‘सोनं’ तोडल्यास गुन्हा!: पुणे। दि. २२ (प्रतिनिधी)

विजयादशमी च्या दिवशी सोने म्हणून कांचन वृक्षाची फांदी तोडल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो. दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर या वृक्षाची होणारी अनधिकृत तोड रोखण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला असून फांद्या तोडताना कोणी आढळून आल्यास संबधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

दसर्‍याच्या निमित्ताने नागरिकांकडून एकमेकांना आपटयाच्या पानांचे सोने म्हणून एकमेकांना दिले जाते. यासाठी अनेकदा आपल्या परिसरातील कांचनवृक्षाच्या फांद्या मोठया प्रमाणावर तोडल्या जातात. हे रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था व नागरिकांनी अशी वृक्षतोड निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ संबधित पोलीस ठाणे अथवा ९९२३0५0६0७ या क्रमांकावर एसएमएस पाठवावेत अशा सूचना उद्यान विभागाने केल्या आहेत.

आपटयाची पाने न वाटता त्या झाडांचे रक्षण करण्याची शपथ मुक्तांगण शाळेतील विद्यार्थ्यांनी आज घेतली. आपटयाच्या वृक्षाखालीच उभे राहून विद्यार्थांनी हा संकल्प सोडला. नेस्ट या संस्थेच्यावतीने या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते.

No comments:

Post a Comment