Wednesday 24 October 2012

मनपाचे उलटे धोरण

मनपाचे उलटे धोरण: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)

टपरीधारक, पथारी, हातगाडीवाले यांच्या पुनर्वसनाचे केंद्र शासनाचे धोरण असताना, त्याची अंमलबजावणी न करता, या छोट्या व्यावसायिकांना त्रास देण्याचे धोरण पिंपरी-चिंचवड महापालिका राबवत आहे, असा आरोप करून खासदार गजानन बाबर यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपाने चुकीच्या पद्धतीऐवजी शासनाच्या धोरणाशी सुसंगत काम करावे, असे प्रभारी आयुक्त अनुपकुमार यांना सांगितले.

डिसेंबरपर्यंत हॉकर्सबाबतच्या धोरणाची अंमलबजावणी करावी, असे केंद्राला अपेक्षित आहे. युद्धपातळीवर हे काम करणे आवश्यक असताना मनपाने मात्र टपरीधारक, पथारी, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. हातगाड्या जप्त केल्या जातात, टपर्‍या उचलून नेल्या जातात. मालाची नासधूस केली जात आहे, असे उलटे धोरण राबविले जात असल्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या नेमक्या धोरणाची जाणीव
करून देण्यासाठी शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली.

No comments:

Post a Comment