Friday 11 January 2013

करार भंगामुळे सहारा स्टेडिमयचे नाव झाकले

करार भंगामुळे सहारा स्टेडिमयचे नाव झाकले: पुणे। दि. ८ ( क्रीडा प्रतिनिधी)

गहुंजे येथे उभारलेल्या क्रिकेट स्टेडियमला नाव देण्यासाठी सहारा समूहाने ठरलेल्या कराराप्रमाणे निधी न पुरविल्याने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) हा करार रद्द केला. त्याचाच एक भाग म्हणून या स्टेडियमला दिलेले ‘सुब्रतो राय सहारा स्टेडियम’ हे नाव आज काळ्या कापडाने झाकले.

सहारा परिवार आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्यात २00७ मध्ये स्टेडियमला ‘सुब्रतो राय सहारा’ हे नाव देण्यासाठी २0७ कोटी रुपयांचाच करार करण्यात आला होता. हा करार फक्त स्टेडियमला नाव देण्यापुरताच होता. सात वर्षांसाठी झालेल्या या करारात सहरा परिवाराने २0७ कोटी रुपये दर महिन्याला ठराविक रकमेने देण्याचे ठरले होते. परंतु गेल्या ६-७ महिन्यांपासून सहारा परिवाराकडून कोणत्याही रकमेचा धनादेश एमसीएला प्राप्त झाला नाही. ६0 कोटींचा पहिला धनादेश मिळाल्यानंतर काही महिने नियमित धनादेश मिळत होते. मिळालेली रक्कम सुमारे ९५ कोटींपर्यंत (कर कपात करून) एमसीएला प्राप्त झाली. नंतर अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही सहारा परिवाराकडून कोणतेही सहकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment