Thursday 28 March 2013

मोशी डेपोतील कचर्‍याच्या शास्त्रोक्त ‘कॅपिंग’साठी ७ कोटी खर्च

मोशी डेपोतील कचर्‍याच्या शास्त्रोक्त ‘कॅपिंग’साठी ७ कोटी खर्च: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)
मोशी डेपोवरील कचर्‍याच्या शास्त्रोक्त कॅपिंगचे काम बीव्हीजी इंडिया कंपनीस देण्यात येणार आहे. या कामाची २0 टक्के कमी दराची ७ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली आहे. सभापती जगदीश शेट्टी यांच्या कार्यकालातील ही शेवटची स्थायी समिती सभा होती.

मोशीत ४५ एकर जागेवर कचरा डेपो आहे. शास्त्रोक्त कॅपिंगसाठी महापालिकेने ८ कोटी ४0 लाख ३४ हजार रुपये खर्च अपेक्षित धरला होता. बीव्हीजी कंपनीची १९.५0 टक्के दराची निविदा लघुत्तम दराची निविदा असल्याने मंजूर करण्यात आली. हा ऐनवेळचा विषय स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला. आदर्शनगर, किवळे येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प कचरा वाहतुकीसाठी कंत्राटदार नेमण्यासंबंधी निविदा मागवली होती. ४४.१0 अशा कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविलेल्या ठेकेदारास काम देण्यास समितीने मान्यता दिली.

पिंपळे गुरव येथील अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी भाडेकरारावर यंत्रसामग्री वापरात आणली. त्या २५ लाख रुपये खर्चाच्या विषयाला सभेने मान्यता दिली. १२ वीनंतरच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक शिक्षणासाठी अर्थसाह्य देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.

नागरी सुविधा केंद्रात नांदेड पॅटर्न
महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या नागरी सुविधा केंद्रांसाठी नांदेडच्या एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. नांदेड जिल्हा सेतू कार्यालय सर्व्हिस सेंटर या एजन्सीला प्रत्येक केंद्रासाठी २५ हजार रुपये याप्रमाणे १६ लाख रूपये देण्याचा प्रस्ताव आहे. ६४ प्रभागांमध्ये केंद्र सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. निशिकांत देशपांडे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सुरुवातीच्या २0 केंद्राच्या निर्मितीसाठी ५ लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यास महापालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment