Thursday 28 March 2013

एलबीटीस विरोध; याचिका फेटाळली

एलबीटीस विरोध; याचिका फेटाळली: पिंपरी। दि. २६ (प्रतिनिधी)

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अंमलबजावणीस स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने एलबीटीची अमंलबाजवणी करण्यचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता व्यापारी संघटना कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पुणे व्यापारी संघांने बुधवारी दुपारी ४ वाजता बिबवेवाडी येथील यश लॉन्स जवळील स्थानक भुवन येथे तातडीची बैठक बोलावली आहे. यात संघटनेची पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे.

१ एप्रिलपासून एलबीटी लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णया विरोधात न्यायालयात राज्यातून २१ याचिका दाखल झाल्या होत्या. तब्बल १७ वकीलांनी व्यापार्‍यांची बाजू मांडली. कर लावण्याचा सरकारला अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे व्यापारी महासंघाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment