Saturday 16 March 2013

पुण्यात महिला अत्याचाराच्या तपासासाठी स्वतंत्र शाखा

पुण्यात महिला अत्याचाराच्या तपासासाठी स्वतंत्र शाखा: पुणे। दि. १५ (प्रतिनिधी)

महिलांच्या गुन्ह्यासंदर्भातील खटले निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालय नुकतेच सुरू करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता त्यांच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र ‘महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा’ पुण्यात सुरू करण्यात येणार आहे.

पुणे शहरामध्ये सध्या गुन्हे शाखा, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा कार्यरत आहेत. त्याचबरोबर, आता महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेची भर पडणार आहे. पुणे पोलिसांनी त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे. या शाखेमध्ये जास्तीत जास्त महिला अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असावा, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

No comments:

Post a Comment