Saturday 16 March 2013

पिंपरीत सराफ - पोलिसांत वाद

पिंपरीत सराफ - पोलिसांत वाद: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

चोरीचे सोने खरेदी प्रकरणाचा तपास करण्यासाठी येथील एका व्यावसायिकापर्यंत पोहोचल्याने सराफ व्यावसायिक आणि पोलिसांत वाद उफाळून आला. चोरीचे सोने खरेदी केलेच नाही, असे म्हणत व्यावसायिकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तर तपासात सहकार्य करून तक्रारदारांचे सोने लवकर परत करा अन्यथा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ई-स्क्वेअर सिनेमागृहाच्या गल्लीत हा प्रकार घडला.

जबरी चोरीच्या गुन्ह्यात खडक पोलिसांनी निगडी आणि देहूराडच्या आरोपींना पकडले. हिंजवडी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांच्या चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले. पिंपरीतील ई-स्क्वेअरलगतच्या एका सराफाला चोरीचे सोने विकल्याची माहिती आरोपींनी दिली. त्यामुळे उपनिरीक्षक महेश सागडे आणि पवार चौकशीसाठी या सराफाकडे पोहोचले. परंतु आपण चोरीचे सोने खरेदीच केले नाही, असा दावा व्यावसायिकाकडून होऊ लागल्याने पोलीस व व्यावसायिकांत वाद निर्माण झाला. हा प्रकार भर रस्त्यात सुरू असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे उपनिरीक्षक सागडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment