Wednesday 10 April 2013

पिंपरी महापालिकेसाठी आता "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम'

पिंपरी महापालिकेसाठी आता "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम' पिंपरी - नागपूरवगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांचा कारभार "मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949' नुसार सुरू आहे. मात्र आता मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांना शासनाच्या निर्णयानुसार "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम' हा नव्याने अस्तित्वात आलेला कायदा लागू होणार आहे. या नवीन कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, पाच डिसेंबर 2012 पासून हा कायदा अमलात आला आहे. 

No comments:

Post a Comment