Friday 17 May 2013

चिंचवड मतदारसंघात २२ हजार दुबार मतदार

चिंचवड मतदारसंघात २२ हजार दुबार मतदार: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्रासह मतदारयाद्या पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार छायाचित्रासह मतदारांची १00 टक्के मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

२0५ -चिंचवड विधानसभा मतदारसंघातील याद्यांची तपासणी केली असता, २२ हजार ८४६ दुबार मतदार आढळून आले आहेत. तसेच या मतदारसंघातून अन्य मतदार संघांत स्थलांतरित झालेले ८२६६ मतदार आढळून आले आहेत. अशा एकूण ३१ हजार ११२ मतदारांची नावे, तपशील, नोटीस मतदार संघाच्या कार्यालयात तसेच महापालिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडे मतदारांची दुबार नावे असलेल्या याद्या पाठविण्यात आल्या आहेत. खासदार आणि आमदार यांनाही यादीच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

१७ ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदारांचे छायाचित्र संकलित करण्याचे काम सुरू राहणार आहे. मतदारांनी रंगीत छायाचित्र, रहिवासी पुरावा सादर करावा. मतदार मदत केंद्रातही छायाचित्र काढण्याची सुविधा आहे. मतदारांनी कार्यालयाकडे संपर्क न साधल्यास स्थलांतरित ३१ हजार ११२ मतदारांची नावे २५ मे २0१३ नंतर मतदारयादीतून वगळण्यात येतील. ज्यांची यादीत छायाचित्र नाहीत, त्यांनी मतदार मदत केंद्राकडे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment