Wednesday 19 June 2013

कंटेनर कलंडल्यामुळे निगडी-तळवडे ...

कंटेनर कलंडल्यामुळे निगडी-तळवडे ...:
कंटेनर रस्त्याच्या कडेला कलंडल्यामुळे निगडी- तळवडे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात आज पहाटे घडला. या अपघातामुळे तळवडे आयटी पार्क आणि  चाकणकडे जाणा-या नोकरदारांना कार्यालयात पोचण्यास उशीर झाला. या अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. येथील वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत आहे.

तळवडे येथे असलेल्या आयटी कंपन्या, चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे अया रस्त्यावर नेहमीच गर्दी असते.त्यात सकाळच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे नोकरदारांना अपल्या कार्यालयात पोचण्यास उशिर झाला. हा रस्ता लहान असल्यामुळे वाहतूक पोलिसांना एकेका बाजूची वाहतूक सोडावी लागत असल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment