Tuesday 25 February 2014

बेकायदेशीर हॉटेल्स बंद करा अन्यथा ...

पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिक आक्रमक
परवानाधारक हॉटेल व्यावसायिक एकीकडे सर्व करांचा बोजा पेलत असताना दुसरीकडे काही व्यावसायिक विनापरवाना फुकटात व्यवसाय करीत आहेत. पोलिसांच्या पाठबळामुळे सुरु असलेल्या या अवैध हॉटेल्समुळे अधिकृत व्यावसायिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून बेकायदा हॉटेल्स बंद करा अन्यथा अधिकृत व्यावसायिकांचे परवाने रद्द करा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली. याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment