PCMC Blog

[In this blog you will find Pimpri Chinchwad's news published in various popular Marathi/English/Hindi news paper. Due to unbiased nature of this blog ultimately citizen will get full coverage of city affairs.]

हा न्यूज ब्लॉग कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया, सूचना या ईमेलवर नक्की पाठवा PimpriChinchwad.CF@gmail.com

Thursday, 21 July 2016

शुक्रवारपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व खड्ड्यांची तक्रार द्या व्हॉट्स अॅप वरून

नागरिकांना तक्रारीच्या निवारणाचाही दिला जाणार प्रतिसाद एमपीसी न्यूज - आता पिंपरी-चिंचवड मधील रस्त्यांवरील खड्ड्यांची व साठलेल्या कच-याची तक्रार शक्रवारपासून व्हॉट्स अॅप वरून देता येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेतर्फे नागरिकांसाठी खास व्हॉट्स अॅप क्रमांक जाहीर केले आहेत. त्यानुसार नागरिकांना कच-यासाठी 7745065999 या क्रमांकावर तर रसत्यावरील खड्ड्यांसाठी 7745061999 क्रमांकावर छायाचित्र काढून संबंधित ठिकाणाची माहिती देत तक्रार नोंदवता येणार आहे.  

No comments:

Post a Comment