Wednesday 18 October 2017

“सीसीटीव्ही’साठी निधी देणार – खासदार बारणे

पिंपरी – चिंचवड परिसरात चोऱ्या, सोनसाखळी हिसकाविणे, वाहनांची तोडफोड अशा घडना घडू नयेत. या घटनांना आळा घालण्यासाठी चिंचवड परिसरात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु, परिसरातील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी स्थानिक नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी खासदार बारणे यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार बारणे यांनी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे.

No comments:

Post a Comment